
सावंतवाडी : माठेवाडा येथे रस्त्याच्या मध्यभागी पुन्हा खड्डा पडला असून अपघात होण्याची भीती आहे. यामुळे मोठी हानी होऊ शकते अस मत राजा शिवाजी चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष,येथील रहिवासी बंटी माठेकर यांनी व्यक्त केले आहे.
माठेवाडा रस्त्याच्या मध्यभागी पुन्हा मोठा खड्डा पडला आहे. आहे सदर रस्त्यावरून शाळकरी मुलं व वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. 2 वर्षा पूर्वी बंटी माठेकर यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व राजू मसूरकर यांच्या मदतीने खड्डा सिमेंट काँक्रेटने बुजवून घेतला होता. नगरपरिषदेचे लक्ष वेधले होते. परंतु, नगरपरिषदेच्या मार्फत कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी तरी नगरपरिषदेने सदर खड्ड्याची पाहणी करून योग्य अशी कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे. अपघाताला निमंत्रण देणारा रस्त्याच्या मध्यभागी पडलेला खड्डा बुजवावा अशी मागणी यशवंत देसाई व बंटी माठेकर यांनी केली आहे.