LIVE UPDATES

सावंतवाडीतील नंदू शिरोडकर यांचं निधन

Edited by: विनायक गांवस
Published on: July 04, 2025 17:41 PM
views 76  views

सावंतवाडी : शहरातील व्यापारी, विठ्ठलभक्त, माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांचे स्वीय सहाय्यक प्रसन्न उर्फ नंदू चंद्रकांत शिरोडकर (वय ६०) यांचे शुक्रवारी दुपारी राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचाराआधीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

आज श्री‌ विठ्ठल-रखुमाई मंदिरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित पालखी सोहळ्यास ते सहभागी झाले होते. आरती, महाप्रसादानंतर दुपारी अस्वस्थ वाटू लागल्याने ते घरी गेले. याचदरम्यान त्यांना हृदयविकाराचा धक्का येऊन त्यांची प्राणज्योत मालवली. प्रतिपंढरी विठ्ठल मंदिर ट्रस्टवर ते सदस्य होते. शहरात त्यांचे किराणा मालाचे दुकान आहे. आमदार दीपक केसरकर यांचे ते विश्वासू सहकारी होते. त्यांच् पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ, भावजय असा मोठा परिवार आहे