
सावंतवाडी : गिरणी कामगार व वारस यांचे आंदोलन येत्या ९ जुलै रोजी मुंबईत होत आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा गिरणी कामगार संघाची तातडीची बैठक येत्या गुरुवार दि. ३ जुलै रोजी सकाळी १० वाजता श्रीधर अपार्टमेंट बस स्थानक सावंतवाडी समोरील (आमदार दीपक केसरकर) कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. यावेळी चर्चा करण्यासाठी सर्व गिरणी कामगार व वारस यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा गिरणी कामगार संघाचे अध्यक्ष शाम कुंभार यांनी केले आहे.