
सावंतवाडी : वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोलीमध्ये प्रमुख धबधबा पोलीस प्रशासनाकडून बंद केला होता. झाड पडल्याने पर्यटकांना धोका निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला. यामुळे विकेंडची मजा लुटण्यासाठी आंबोलीत आलेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला. झाड पडल्याने पर्यटकांना धोका निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घेत ते हटविण्यात आले. पोलिस व स्थानिकांच्या मदतीने ते झाड हटविण्यात आले.