सावंतवाडी बसस्थानकाचा पीपीटी तत्वावर विकास होणार : दीपक केसरकर

Edited by: विनायक गांवस
Published on: June 16, 2025 16:52 PM
views 189  views

सावंतवाडी : दोडामार्ग मांगेली येथे घडलेली घटना दुर्दैवी आहे. जीवीत हानीचे प्रकार रोखण्यासाठी महावितरणने दक्षता घेणं आवश्यक आहे. गवस कुटुंबाची मी भेट घेणार आहे‌. हा अपघात कसा घडला याची चौकशी करण्यात येणार असून भविष्यात कोणाचेही हकनाक जीव जाता नयेत यासाठी आवश्यक सुचना महावितरणला करणार असल्याचे माजी मंत्री, आम. दीपक केसरकर यांनी सांगितले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

ते म्हणाले, मांगेली कुसगेवाडी वीजेचा जोरदार धक्का लागून घडलेला प्रकार दुर्देवी आहे‌. गवस कुटुंबाची मी भेट घेणार आहे. त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. महावितरणन दक्षता घेण आवश्यक असून हा अपघात कसा झाला याची चौकशी केली जाणार आहे. कोणाचाही जीव जाणार नाही यासाठी सुचना करणार असल्याचे श्री. केसरकर यांनी सांगितले. तसेच इतरही वीजेच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. 

दरम्यान, सावंतवाडी बसस्थानकाचा पीपीटी तत्वावर विकास होणार आहे‌. हायवे लगत असल्यानं पूर्णपणे अत्याधुनिक असं हे स्थानक होईल. दरम्यानच्या काळात येथे पडलेले खड्डे व डागडुजी करण्यात येत आहे‌. आंतरराष्ट्रीय दर्जाचं अस हे स्थानक सावंतवाडीत उभं राहील‌ असा विश्वास श्री. केसरकर यांनी व्यक्त केला. तसेच सावंतवाडीकरांनी मला अनेक वर्षे प्रेम दिलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळाय महायुतीची सत्ता न.प. दिसेल असा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत विचारल असता त्यांनी व्यक्त केले. तर आंबोलीत वन विभागाकडून पर्यटकांना धबधब्यांच्या ठिकाणी सोडण्यासाठी वाहनं उपलब्ध करून दिली आहेत. पर्यटकांना ये-जा करण्यासाठी याचा वापर करणं क्रमप्राप्त आहे. त्यामुळे पोलिस आणि वन विभागाशी चर्चा करून होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी दक्षता घेतली जाईल, अशी माहिती श्री‌. केसरकर यांनी दिली‌. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, अशोक दळवी, विद्याधर परब, परिक्षित मांजरेकर, विनोद सावंत, बंटी पुरोहित, अर्चित पोकळे आदी उपस्थित होते.