गणित प्रज्ञा परीक्षेत RPD प्रशालेचे घवघवीत यश

Edited by: विनायक गांवस
Published on: June 15, 2025 19:29 PM
views 104  views

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ यांच्यावतीने दरवर्षी गणित विषयाची स्पर्धा परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा तीन टप्प्यात पूर्ण होते. गणित संबोध , गणित प्रावीण्य आणि गणित प्रज्ञा. अतिशय कठीण, प्रतिष्ठेच्या गणित प्रज्ञा राज्यस्तरीय परीक्षेत राणी पार्वती देवी हायस्कूल प्रशालेच्या इ. 08 वीच्या  सोहम बापूशेट कोरगावकर आणि तन्वी प्रसाद दळवी या दोन्ही विद्यार्थ्यांनी रौप्य पदकाची कमाई केली आहे. तसेच राज्य प्रज्ञावान विद्यार्थ्यांच्या यादीत स्थान पटकाविले आहे.

या यशस्वितेसाठी व RPD प्रशालेचे नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल दोन्ही विद्यार्थ्यांचे , पालक व मार्गदर्शक शिक्षक या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष विकास सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर , सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष अमोल सावंत व सर्व संस्था सदस्य तसेच तसेच मुख्याध्यापक श्रीम. संप्रवी कशाळीकर, उपमुख्याध्यापक एस. एन‌. पाटील , उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, पालक ,शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी , पालक- शिक्षकसंघ यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.