ST चालकाचा प्रामाणिकपणा

Edited by:
Published on: June 14, 2025 19:05 PM
views 1049  views

सावंतवाडी : पुणे - सावंतवाडी गाडीवर काम करत असताना एका महिला प्रवाशाची बॅग गाडीमध्ये राहिली होती. त्या बॅगेत दोन लॅपटॉप सहा हजार रुपये कॅश आणि मौल्यवान वस्तू होत्या. ती बॅग प्रवाशाची संपर्क साधून कोल्हापूर स्थानक प्रमुख सचिन पाटील यांच्या समक्ष सावंतवाडी आगारचे चालक तथा वाहक धनराज लक्ष्मण कासार  यांनी प्रामाणिकपणे परत केली. त्याच्या ह्या कार्याबद्दल त्याचे कौतुक होत आहे.