
सावंतवाडी : कोकण म्हणजे पुर्थीवरचा स्वर्ग. मात्र, या स्वर्गातही एक स्वर्ग आहे ते म्हणजे आंबोली. आठवडाभर कोसळणाऱ्या धारांमुळे आंबोली पर्यटकांना साद घालू लागली आहे. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर आंबोली पर्यटकांनी भरून जाणार आहे. आंबोली घाटातील डोळ्याची पारणं फेडणारी ही दृश्य पाहून देश विदेशातील पर्यटक इथे येण्यासाठी व्याकुळ होतात. जिल्ह्यात सध्या अवकाळी पाऊस पडत असून मान्सून देखील उंबरठ्यावर आहे.
यामुळे आंबोली घाटात ढगांची चादर पसरल्याचं चित्र आहे. घाट परिसरातून खोल दरीत पाहिल्यावर ढगांच्या आच्छादन पहायला मिळत आहे. ही मनमोहक अशी दृश्य प्रत्येकजण आपल्या मोबाईल, कॅमेरात कैद करत आहेत.