शक्तीपीठचा मोबदला गेळे कबुलायतदार पात्र लाभार्ती कुटुंबाना समान पद्धतीत मिळावा : संदीप गावडे

Edited by: विनायक गांवस
Published on: May 26, 2025 11:40 AM
views 156  views

सावंतवाडी : शक्तिपीठ महामार्गासाठी गेळे मधील सुमारे १२२ एकर क्षेत्र जाणार असून त्यासाठी जमिनीचा भूसंपादन मोबदला गेळे कबुलायतदार पात्र लाभार्ती कुटुंबाना समान पद्धतीत मिळावा यासाठी जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधण्यात आले. भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी याबाबतचे निवेदन त्यांना दिले.

गावडे यांच्या नेतृत्वात शासनाकडे ही मागणी करण्यात आली. यावेळी गेळे सरपंच सागर ढोकरे,उपसरपंच विजय गावस चेतन गावस आदी उपस्थिती होते. अनुदान प्रक्रिया राबवत असताना महामार्गसाठी लागणारे क्षेत्र वगळता प्रस्तावित वाटप नकाशांमध्ये बदल करून उर्वरित क्षेत्र २३ जुलै २०२३ चा शासन निर्णया नुसार वाटप करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.