शहरातील भटवाडीत ७४ तासांनी लाईट

कर्मचाऱ्यांनी भर पावसात जीवाची बाजी लावून पंधरा पंधरा तास केलं काम
Edited by:
Published on: May 23, 2025 18:56 PM
views 206  views

सावंतवाडी : सुमारे ७४ तासांच्या अथक प्रयत्नानंतर भडवाडीतील विद्युत पुरवठा सुरू करण्यास यश आले. गेले चार दिवस भटवाडी भागातील लाईट बंद होती. त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत होते. वीज वितरणचे अधिकारी आणि कर्मचारी विद्युत प्रवाह सुरू करण्यासाठी गेले चार दिवस अथक प्रयत्न करत होते. त्यांच्या प्रयत्नाला आज यश आले. वीज वितरण चे अधिकारी इंजिनियर्स आणि कर्मचारी भर पावसातही जीवाची बाजी लावून पंधरा पंधरा तास काम करत होते. त्यांचे आभार मानत असल्याचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी स्पष्ट केले.