
सावंतवाडी : नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या संस्थानकालीन पाणवठ्याला पुनर्जीवन देण्यात आले. कडक उन्हाळत वन्यप्राण्यांसाठी नैसर्गिक पाण्याची सोय यामुळे होणार आहे. १२ महिने वाहणारे अनेक लहान पाणवठे गेले कित्येक वर्षे दुर्लक्षीत असल्याने प्राण्यांची गैरसोय होते. त्यामुळे प्राण्यांचा पाण्यासाठी लोकवस्तीत वावर होतो. युवासेना तालुकाप्रमुख प्रतिक बांदेकर यांच्या मागणी नुसार सावंतवाडी नगरपरीषद यांच्या माझी वसुंधरा अभियान ६.० या कार्यक्रमा अंतर्गत स्थानिक युवक व नगरपरीषद कर्मचारी यांच्या सहकार्याने हे श्रमदान करण्यात आले.यात
प्रतीक बांदेकर,शेखर जाधव ,बाबू जबरे ,नेत्रन धुरी , रुद्र वेंगुर्लेकर ,अरविंद परब व नगरपरीद कर्मचारी उपस्थित होते. यासाठी मुख्याधिकारी अश्विनी पाटील व उद्यान पर्यवेक्षक गजानन परब यांचे विशेष सहकार्य लाभले.