कनेडी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी सतीश सावंत बिनविरोध

दर्जेदार आणि व्यावसायिक शिक्षण हे संस्थेचे उद्दिष्ट : सतीश सावंत
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 31, 2022 14:36 PM
views 213  views

कणकवली : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई या संस्थेची सलग चौथी निवडणूक बिनविरोध झाली असून संस्थेच्या अध्यक्षपदी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांची बिनविरोध निवड झाली आहे. दर्जेदार आणि व्यावसायिक शिक्षण हे संस्थेचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन सतीश सावंत यांनी यावेळी व्यक्त केला आहे.


कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच मुंबई येथे  घेण्यात आली होती. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण  सभा रविवारी मुंबई येथे झाली. तत्पूर्वी संस्थेच्या माध्यमातून पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली होती. या निवडणुकीमध्ये संस्थेच्या अध्यक्षपदी सतीश सावंत , उपाध्यक्षपदी प्रभाकर सावंत, सरचिटणीस  शिवाजी सावंत तर खजिनदार पदी प्रकाश सावंत यांची निवड करण्यात आली. संस्थेच्या कार्यकारणी संचालक म्हणून डॉ. प्रदीप सावंत, सुधीर सावंत,  संजय लवु सावंत, रत्नाकर सावंत, संजय दामोदर सावंत, संदेश सावंत, नागेश सावंत, दत्तात्रय सावंत,  जयप्रकाश सावंत , जयवंत सावंत,  व्ही. बी. सावंत यांची निवड झाली आहे. संस्थेच्या कायदेशिर सल्लागार सदस्य पदी अॅड. जगदीश सावंत, अॅड. मिलिंद मोहन सावंत, अॅड. सोनल सावंत-परब, अंतर्गत हिशेब तपासणीस रविंदर पुंडलिक सावंत आणि गितेश वळंजू,  सल्लागार सदस्य विलास भास्कर सावंत यांची निवड झाली आहे.  


संस्थेच्या वार्षिक सभेत बोलताना सतीश सावंत म्हणाले, कनेडी शिक्षण संस्थेची प्रगती ही दिवसेंदिवस होत आहे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून विज्ञान शाखेला अनुदान मिळाले. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही विज्ञान शाखेतून शिक्षण घेणे सोपे झाले आहे. कनेडी शिक्षण संस्थेची स्थापना १९५३ साली झाली. त्यानंतर आमच्या संचालक मंडळाने कारभार हातात घेतल्यानंतर संस्थेमध्ये विविध प्रकारची प्रगती झाली आहे. शैक्षणिक संकुलन दर्जेदार करण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले आहे. अटल टिंकरिंग लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळणार आहे. अत्यंत दर्जेदार अशी ही अटल लॅब तयार करण्यात आली आहे. प्राथमिक ते उच्च माध्यमिक दर्जेदार शिक्षण देण्यात साठी आम्ही कटीबद्ध आहोत.


श्री सावंत म्हणाले, कणेरी शिक्षण संस्थेचा दहावी बारावीचा निकाल सातत्याने शंभर टक्के लागत आहे मात्र यापुढे संस्थेचा निकाल गुणवत्तापूर्वक लागावा प्रत्येक विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत असताना त्यांना वैद्यकीय अभियांत्रिकी व अन्य उच्च शिक्षण घेण्यासाठी पूरक असे प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आगामी काळामध्ये नीट जेईई सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थीही पुढे यायला हवेत असे नियोजन संस्थेने केले आहे शिक्षण संस्थेमध्ये दर्जेदार शिक्षणाबरोबर उत्कृष्ट असे खेळाडूही तयार होत आहेत कॅरम स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावरही आमच्या संस्थेचे विद्यार्थी खेळत आहेत शालेय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थी प्रगती करत आहेत संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत यावर्षी अटल टीकरिंग लॅब आणि दर्जेदार व्यायाम शाळा ही विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून अटल टिकरिंग लॅब  मंजूर झाली असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास होईल असा विश्वासही श्री. सावंत यांनी व्यक्त केला आहे.