सासोली खुर्द सरपंच प्रवीण गवस यांना नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी दिल्या शुभेच्छा

Edited by: संदीप देसाई
Published on: October 17, 2022 19:43 PM
views 191  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात झालेल्या दोन ग्रामपंचायतच्या निवडणुकीत भाजपने वर्चस्व मिळवीत दोन्ही ठिकाणी थेट सरपंच पदाची निवडणूक जिंकून ताकद दाखविली आहे. दरम्यान दोडामार्ग पाटये पुनर्वसनच्या सासोली खुर्द ग्रामपंचायत सरपंच पदी विराजमान झालेले प्रवीण गवस यांचा भाजपच्या वतीनं नगराध्यक्ष चेतन चव्हाण, रंगनाथ गवस यांनी खास अभिनंदन केलं.

यावेळी माजी तालुकाध्यक्ष प्रवीण गवस, सुनील गवस, शंकर देसाई, नाईक आदी उपस्थित होते.