संतोष यशवंत पाटील याची निर्दोष मुक्तता..!

अॅड. राजेंद्र रावराणे यांचा यशस्वी युक्तिवाद
Edited by:
Published on: March 22, 2024 09:46 AM
views 215  views

सिंधुदुर्ग : दिनांक ७  सप्टेंबर २०१८ रोजी फिर्यादी उत्तम यशवंत पाटील व त्यांचा मुलगा ( रा. -पोईप, ता. मालवण, जिल्हा. सिंधुदुर्ग) यांना शिवीगाळ करून, त्यांच्या अंगावर मातीची वीट फेकून मारून त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत करून तसेच बांबूच्या दांड्याने फिर्यादी यांच्या डोक्यावर व उजव्या हाताच्या मनगटावर मारून गंभीर स्वरुपाची दुखापत केलेप्रकरणी संतोष यशवंत पाटील, रा. मु. पो. पोईप, ता. मालवण याची मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण एम.आर. देवकाते यांनी २१ मार्च २०२४ रोजी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.

आरोपीच्यावतीने अॅड. राजेंद्र व्ही. रावराणे, अँड. प्राजक्ता गावकर यांनी काम पाहिले.  दिनांक ७ सप्टेंबर २०१८ रोजी फिर्यादी उत्तम यशवंत पाटील व त्यांचा मुलगा रा. पोईप, ता. मालवण, जिल्हा. सिंधुदुर्ग असे दोघे त्यांच्या घराच्या पुढच्या पडवीत बसून त्यांच्या घरी असलेल्या ब्राह्मण भोजनाच्या कार्यक्रमासाठी लागणारे नारळ सोलत होते. त्यावेळी संतोष यशवंत पाटील, रा. मु. पो. पोईप, ता. मालवण हे त्या ठिकाणी येवून काहीही कारण नसताना फिर्यादी यांना शिवीगाळ करून, त्यांच्या अंगावर मातीची वीट फेकून मारून त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत केली. तसेच बांबूचा दांडा घेवून फिर्यादी यांच्या  डोक्यावर व उजव्या हाताच्या मनगटावर मारून गंभीर स्वरुपाची दुखापत केली. तसेच सदर बांबूचा दांडा फिर्यादी यांचा मुलगा कु.स्वप्निल याच्या पाठीवर मारून त्यालाही दुखापत केली असा आशयाची फिर्याद दिलेवरून संतोष यशवंत पाटील, रा. मु. पो. पोईप, ता. मालवण, जिल्हा-सिंधुदुर्ग  याचे विरुद्ध मालवण पोलीस स्टेशन  भा.द .वि  कलम ३२६, ३२४, ३२३, ३३७, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा रजिस्टर नं. ९९/२०१८  येथे गुन्हा नोंद झाला होता.