साळशी केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संतोष साळसकर...!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 19, 2023 18:23 PM
views 114  views

देवगड : देवगड तालुक्यातील केंद्र शाळा साळशी न. १ च्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संतोष आत्माराम साळसकर यांची तर उपाध्यक्षपदी ञिशा तुषार गावकर यांची एकमताने निवड करण्यात आली.

केंद्र शाळा साळशीच्या पालक सभेत शालेय व्यवस्थापन समिती नव्याने गठीत करण्यात आली. यावेळी ही निवड करण्यात आली यावेळी शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.