
दोडामार्ग : नगरसेवक पदावरून अपात्र करण्यासंदर्भात आपल्या विरोधात दाखल करण्यात आलेला तक्रार अर्ज अखेर जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी फेटाळून लावला त्यामुळे आपले नगरसेवक पद अबाधित राहिले आहे. मात्र हे सारे करण्यासाठी मला व भाजपच्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरणं करण्यासाठी पडद्यामागून सूत्र हलविनाऱ्या वृत्तींचा येत्या काळात आम्ही निकाल लावू असा इशारा बुधवारी दोडामार्ग येथे झालेल्या पत्रकार परिषदेत नगरसेवक संतोष नानचे यांनी दिला आहे.
नानचे यांनी येथील स्नेह रेसिडेन्सी हॉटेल मध्ये श्री. नानचे यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपचे शहराध्यक्ष पांडुरंग बोर्डेकर, नगरसेवक रामचंद्र ठाकूर, सासोली उपसरपंच वैभव फाटक, संतोष हडीकर उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, शहरातील नागरिक समीर रेडकर व गोकुळदास बोंद्रे यांनी श्री. नानचे यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांचेकडे अपात्रेतेबाबत तक्रार दाखल केली होते. गतवर्षी १६ जून २०२३ रोजी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या न्यायालयात संतोष नानचे यांना नगरसेवक पदाकरीता अपात्र ठरविण्याबाबतचा त्यांचा तक्रार अर्ज दाखल होता. तसेच या तक्रार अर्जात श्री. नानचे यांच्या विरुद्ध अन्य मुद्देही मांडण्यात आले होते. या संदर्भात जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या न्यायालयात दावा चालू होता. यावेळी नानचे यांचे बाजू ऍड. सोनू गवस यांच्यामार्फत आपली सविस्तर बाजू मांडली. तक्रारदार श्री. रेडकर व श्री. बोंद्रे आणि श्री. नानचे य दोहोंचे मुद्दे विचारात घेता संतोष नानचे यांनी आपल्या नगरसेवक पदाचा गैरवापर केल्याचे सिद्ध होत नसल्याने तक्रारदारांचा अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी शुक्रवारी ५ जुलै रोजी दिले आहेत. जिल्हाधिकारी यांनी सत्याच्या बाजूने न्याय दिल्याचे सांगत त्यांनी जिल्हाधिकारी आभार मानले आहेत.
या कठीण काळात आपल्या समवेत खंबीरपणे उभे राहणारे भाजपचे पदाधिकारी, भाजपा नेते नारायण राणे, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांसह भाजपचे जिल्हाध्यक्ष व सर्वांचा आपण ऋणी असल्यासही त्यांनी स्पष्ट केल आहे.
कोकण आयुक्तांकडे दाद मागणार : समीर रेडकर
आमचा लढा न्यायासाठी आहे. आम्हाला खात्री आहे की आम्हाला न्याय मिळणार आहे. जो निर्णय जिल्हाधिकारी यांनी दिला तो आपल्याला मान्य नाही. या निर्णय आणि निकलाच्या विरोधात आम्ही कोकण आयुक्तांकडे अपील करणार आहोत. जो निर्णय झाला, तो एकतर्फीने झाला आहे अस आम्हाला दिसून येते. इतकेच नव्हे तर काही राजकीय हस्तक्षेप यात आम्हाला दिसून येत आहे. मात्र कोकण आयुक्त यांच्याकडे आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास समीर रेडकर यांनी प्रसिध्दी पत्रकन्वये स्पष्ट केला आहे.