शांतिनिकेतनचं ऑलंपियाडमध्ये 'सुवर्ण' यश ; तब्बल 13 विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल

Edited by: विनायक गावस
Published on: June 30, 2023 11:56 AM
views 177  views

सावंतवाडी : सावंतवाडी येथील शांतिनिकेतन इंग्लिश प्रायमरी स्कुलच्या विद्यार्थ्यानी ऑलंपियाड फाऊंडेशन तर्फे घेतल्या गेलेल्या मॅथ्स व सायन्स विषयाच्या स्पर्धा परीक्षेत १००% यश संपादन केले. तसेच प्रशालेच्या तर्फे परीक्षेस प्रविष्ठ एकुण ७४ विद्यार्थ्यांपैकी तब्बल १३ विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदके प्राप्त केली. तसेच चार विद्यार्थी विभागीय परीक्षेस पात्र ठरले.

शाळेतील कु. किंजल होडावडेकर ( इयत्ता २ री ) रौनक नाईक, मोक्षद परब, हर्ष सावंत, प्रतिक मेस्त्री (इयत्ता ३ री) समृद्धी देसाई, गीता मेहता, भार्गवी सावंत, यशराज सामंत इयत्ता (इयत्ता ४ थी) संकेत राणे ( इयत्ता ५ वी) स्वरदा पराडकर ( इयत्ता ६ वी ) दिपराज गावडे, सुरज सावंत ( इयत्ता ७ वी) या विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्राप्त झाली.

या सर्व उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शाळेचे कार्याध्यक्ष श्री. विकास सावंत, उपाध्यक्ष अनंत ओटवणेकर. नारायण देवरकर, सचीव व्ही. बी. नाईक. कार्यकारी संचालक विक्रांत सावंत. मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब नंदिहळ्ळी, मुख्याध्यापक समीर परब, पर्यवेक्षक अनिल सावळे तसेच सर्व शिक्षकवर्ग यांनी अभिनंदन केले. यासर्व विद्यार्थ्यांना प्रशालेच्या शिक्षिका सौ. श्रुती मराठे, सौ. अरुणा नाईक – पोपकर, वैभवी राणे यांचे मार्गदर्शन लाभले.