
सावंतवाडी : नगरपरिषदेच्या पहिल्या दिवशी त्यांनी जनतेला भेटाव अशी लोकांची अपेक्षा असते. मात्र, १२ वाजत आले तरी कक्षाच दार बंद आहे. यांना भेटायला राजवाड्यात जावं लागेल हे पूर्वीच सांगितले होत. लोकांनी निवडून दिलय त्यामुळे लोकच काय ते बघतील असा जोरदार हल्लाबोल शिवसेना नगरसेवक तथा जिल्हाप्रमुख संजू परब यांनी लगावला.
आज शिवसेना नगरसेवकांसह त्यांनी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची भेट घेतली. विरोधक म्हणून आम्ही भुमिका बजावणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच नगराध्यक्ष दालन बंद असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. राजवाड्यात जाऊन लोक आपल्या समस्या सोडवतील असा टोला हाणत माझी भूमिका बदलत नाही. आम्ही विरोधकाची भुमिका पार पाडू अस मत श्री. परब यांनी व्यक्त केले. यावेळी नगरसेवक बाबु कुडतरकर, अजय गोंदावळे, देव्या सुर्याजी, शर्वरी धारगळकर, ॲड.सायली दुभाषी, स्नेहा नाईक, क्लॅटस फर्नांडिस, सत्यवान बांदेकर, परिक्षित मांजरेकर, अर्चित पोकळे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते










