आ. केसरकरांनी घेतली सावंतवाडी - वेंगुर्ल्याची जबाबदारी

Edited by: विनायक गांवस
Published on: December 22, 2025 14:45 PM
views 201  views

सावंतवाडी : सावंतवाडी व वेंगुर्ले या दोन नगरपरिषदांवर जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. दोन्ही शहरांच्या विकासासाठी आमदार म्हणून मी नेहमी साथ देणार असून विकासासाठी नेहमीच आमचे सहकार्य राहणार आहे अशी माहिती माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी दिली.


श्री. केसरकर पुढे म्हणाले, निवडणूक प्रचाराच्या वेळी माझी प्रकृती बरी नव्हती. त्यामुळे मला या निवडणुक प्रक्रियेत सहभाग घेता आला नाही. त्यामुळे आम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र, जनतेनं दिलेली साथ आमच्यासाठी महत्त्वाची आहे. पराभवाची जबाबदारी ही माझीच आहे. दोन्हीहीकडे मित्रपक्षांची सत्ता आली आहे. आमदार म्हणून माझे नेहमीच सहकार्य राहणार आहे अशी माहिती त्यांनी दिली