
कणकवली : 2018 ला माझा 36 मतांनी पराभव पाहून त्यावेळी भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याही डोळ्यात अश्रू होते, त्यांना वाईट वाटले त्यांनी सांगितले. संदेश वाईट वाटून घेऊ नकोस अटल बिहारी वाजपेयी यांची कविता आठव तू पुढच्या वेळी निवडणूक लढायला पाहिजेस. या रवींद्र चव्हाण यांच्या आधारापासून मी प्रेरणा घेतली आणि आज मी निवडून आलो तत्कालीन कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अश्रूंची आज मी फुले केली आहेत असे संदेश पारकर यांची भावनिक प्रतिक्रिया देताना सांगितले आहे.










