चिपळूण तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्षपदी संजू वाघमारे

सचिव पदी शंकर गलांडे
Edited by: मनोज पवार
Published on: October 17, 2024 09:36 AM
views 189  views

चिपळूण : चिपळूण तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी आकले हायस्कुलचे मुख्याध्यापक संजू वाघमारे यांची तर सचिव म्हणून बोरगाव हायस्कुलचे मुख्याध्यापक शंकर गलांडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून महाराष्ट्र हायस्कुलचे इम्तियाज इनामदार व निरबाडे हायस्कुलच्या सौ. शारदा बेंडाळे,जिल्हा प्रतिनिधी म्हणून संजय चव्हाण व अनंत साळवी,सहसचिव उदयराज कळंबे,खजिनदार मंदार सुर्वे,विद्यासमिती सचिव श्रीधर जोशी,तर कार्यकारिणी सदस्य म्हणून अश्रु अस्वले,भाऊ कांबळे,महेंद्र शिरकर,राजेंद्र जाधव,विनायक माळी,राजेंद्रकुमार ओंबासे,धनाजी देसाई,सौ.वीणा चव्हाण,श्रीमती खैरदी नझरत,शबनम फरीदी, सौ. स्वप्नाली पाटील,महेंद्र साळुंके,शैलेश सुर्वे,सल्लागार म्हणून बाळासाहेब जगताप,  रोहित जाधव, राम गाडवे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.