संजू परब यांचा उद्धव ठाकरे सेनेला मोठा धक्का !

मातब्बर नेत्यांचे भाजपात प्रवेश
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 20, 2022 17:07 PM
views 812  views

सावंतवाडी : आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला भाजपनं धक्का दिलाय. माजगांव ग्रा. पं सदस्य रिचर्ड  डिमेलो, केवईन फर्नांडिस यांनी भाजप जिल्हा प्रवक्ते, माजी नगराध्यक्ष संजु परब यांच्या हस्ते भाजपात प्रवेश केलाय. शिवसेना ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यावेळी  माजी नगराध्यक्ष संजु परब, मनोज नाईक,सचिन  बिर्जे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा शक्तिकेंद्र प्रमुख  बाळा वेजरे, सुधिर वारंग, अजय सावंत, सरपंच संघटना जिल्हा उपाध्यक्ष विनोद राऊळ,आनंद नेवगी ,दिलीप भालेकर, बांदा सरपंच अक्रम खान, एॅड.अनिल निरवडेकर आदी उपस्थित  होते.