
सावंतवाडी : शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सेनेत घेण्याचा धडाका लावला आहे. शिवसेनेत येणाऱ्यांचे प्रमाण वाढतच दिसत आहे. आज सावंतवाडी शहरातील झिरंगवाडी भागातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शेकडो पदाधिकारी माजी शालेय शिक्षण मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सेनेत डेरेदाखल झालेत.
यावेळी सावंतवाडी शहरप्रमुख बाबू कुडतरकर, सचिव परीक्षित मांजरेकर, युवा सेना विधानसभा प्रमुख अर्चित पोकळे, कोलगाव शाखाप्रमुख गौरव कुडाळकर, समीर पालव यांसह शिवसेना व युवा सेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यात विशेष बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला शहराध्यक्ष ॲड. सायली दुभाषी, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष ॲड. राबिया शेख, अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष झहूर खान, अल्पसंख्यांक सेल तालुकाध्यक्ष इलियास आगा, तालुका उपाध्यक्ष तौसिफ आगा, अल्पसंख्यांक सेल तालुका सरचिटणीस सोहेल शेख, फिरोज खान, आरिफ खान, शौकत बेग, अनिस शेख, अझहर रेशमी, रियाज अत्तार, रमजान नाईकवाडी, वाजीद खान, शहाबाद आगा, मंगेश घाडीगावकर, पापा ऐन्नी, रुकसाना खान, काशिनाथ दुभाषी, साजिदा फिरोज खान, श्रावणी श्रीकांत कोरगावकर, श्रीकांत कोरगावकर, गणेश निंबाळकर, सिद्धी नागेश निंबाळकर, तैमीन तहसीलदार, फिरदोस जहूर खान, नंदिनी वेंगुर्लेकर, अलका अर्जुन नाईक, महेक महंमद खान, शहनाज आरिफ खान, अमृता अनिल नाईक, सकीना वाजिद खान, फातिमा अहमद खान, जिलेखा आयुब खान, नुसरत असिफ खान, रिदा अझहर रेशमी, हसीना पापा ऐन्नी, फरदीन शेख, वाहिदा शौकत बेग, झेबा नाईक, अनुष्का मातोंडकर, शेवंती घाडीगावकर, फैजा खान यांसह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झालेत.