....तर निवडणूक सोडून तेलींना कणकवलीत जाव‌ लागेल : संजू परब

बॅनरवरून शिवसैनिक आक्रमक
Edited by: विनायक गांवस
Published on: November 06, 2024 18:08 PM
views 616  views

सावंतवाडी : महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्याविरोधात लावलेला तो बॅनर हा विरोधी उमेदवार राजन तेली यांच्याकडून लावण्यात आला आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब यांनी केला. रात्री दरोडेखोरासारखे बॅनर लावायची सवय ही तेलींनाच आहे. राणेंच्या विरोधात लावलेला हा बॅनर शेवटचा आहे. यापुढे मतदारसंघात एकजरी बॅनर दिसला तर आम्ही असे बॅनर लावू की तेलींना निवडणूक सोडून कणकवलीत जावे लागेल असा इशाराही श्री. परब यांनी यावेळी दिला. येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 


ते म्हणाले, समोर येऊन लढण्याची हिंमत तेलींमध्ये नाही. त्यामुळे ते अंधारात लहान मुलांसारखे अशी बालीशकृत्ये करत आहेत. दरोडेखोरासारखे रात्रीचे बॅनर लावत आहेत‌.‌ हिंमत असेल तर त्यांनी जाहीर सभा घेऊन आरोप करावेत. त्याला उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत. राणेंच्या विरोधात लावलेला हा शेवटचा बॅनर आहेत. यापुढे एकजरी बॅनर लावला तर तेलींना निवडणूक सोडून कणकवलीत जावे लागेल असा इशारा शिवसेना जिल्हा संघटक संजू परब यांनी दिला. आम्हाला बाहेरची माणस नको. सावंतवाडीतील लोकप्रतिनिधी सक्षम आहेत. आम्ही तक्रार करत नाही, औकात काढतो. त्यामुळे कुणाला शोधायची गरज नाही.‌ बॅनर कोणी लावले आम्हाला माहीत आहे. याची माहीती जाहीरपणे प्रशासनाला देत आहे‌. त्यामुळे यापुढे त्यांनी अशी हिंमत करू नये. आमच्या बॅनरमधील मजकूर असा असेल की ते पुन्हा बॅनर लावायची हिंमत करणार नाही. याप्रसंगी जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, युवासेनेचे सुरज परब, हेमंत बांदेकर, क्लेटस फर्नांडिस आदी उपस्थित होते.