संजू परब यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव | संजू परब जनतेच्या मनातला माणूस : निलेश राणे

आमदारकीसाठी मान्यवरांच्या शुभेच्छा
Edited by: विनायक गावस
Published on: August 19, 2023 14:25 PM
views 137  views



सावंतवाडी : माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी सावंतवाडीच्या आमदारकीसाठी संजू परब यांना संधी मिळावी अशा शुभेच्छा  

उपस्थित मान्यवरांनी दिल्या. यावेळी संजू परब जनतेच्या मनातला माणूस आहे. येणारा काळ त्यांचाच आहे असं प्रतिपादन भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी केल. 


संजू परब यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा करण्यात आला. त्यांच्या कार्यालयासमोर अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित राहत मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी संजू परब हा आमच्या कुटुंबातील सदस्य आहे. त्यामुळे त्याचा वाढदिवस हा आमचा कौटुंबिक सोहळा आहे. त्याचा वाढदिवस मी कधीही चुकवत नाही. गेल्या अनेक वर्षांचं असलेलं आमचं हे नातं आम्ही दोन्ही बाजूने टिकवलं आहे. अनेक उन्हाळे पावसाळे आले मात्र माणूस म्हणून संजू कधीही बदलला नाही. पद येतात जातात पण जोडलेली नाती व संबंध कायम राहतात. संजूचा हाच गुण वाखाणण्याजोगा असून त्याला नाती जपता येतात. राजकारणात ज्याला नाती व संबंध जपता येतात तोच राजकारणात यशस्वी होतो. मात्र, ज्याला लोकांची मन कळली तो लोकांच्या 'मनातील नेता' होतो. पक्षात काम करत रहा, पक्षाला मोठ करा, पक्ष तुम्हाला मोठा करेल असं मत निलेश राणे यांनी व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. 


दरम्यान,कार्यकर्ता कसा घडावा याच ज्वलंत उदाहरण म्हणजे संजू परब आहेत. प्रत्येकाच्या मनात त्यांनी स्थान निर्माण केलं आहे. यशस्वी उद्योजक, राजकारणी यांसह दिलदार माणूस म्हणून त्यांंची ओळख आहे असं मत युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केले. ग्रामीण भागातून येत शहरात नेतृत्व करणं सोपं नाही. मात्र, संजू परब यांनी ते सिद्ध करुन दाखवलं. नगराध्यक्षपदाची कारकीर्द यशस्वीपणे सांभाळली. नेतृत्व कसं असावं हे त्यांनी दाखवून दिलं. हे नेतृत्व विधानसभेत जावं अशी माझी इच्छा आहे. सावंतवाडीत परिवर्तनाची गरज आहे. शहरानंतर विधानसभेत संजू परब यांच्या माध्यमातून ते परिवर्तन घडेल अस मत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. संजू परब यांनी नगराध्यक्ष म्हणून सर्वसामान्य कार्यकर्त्यांत ओळख निर्माण केली. अनेकांना जमलं नाही ते संजू परब यांनी करुन दाखवल. आमदार कोण याची लढाई इकडे नाही. फळाची अपेक्षा न करता काम करत रहावं, विधानसभेत आमदार कोण होईल हा प्रश्न नाही. तरूणांना रोजगार कसा मिळेल हा प्रश्न आहे. मतदारसंघ मागे पडतोय ही खरी चिंता आहे. मतदारांची फसवणूक होत असताना जाग होण गरजेच आहे. त्यासाठी जिल्ह्यातील तिन्ही आमदार, खासदार व स्थानिक स्वराज्य संस्थावर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी जोमानं कामाला लागावं असं मत माजी आमदार राजन तेली यांनी व्यक्त केले. 


उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केक कापून संजू परब यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दरवर्षी वाढदिनी कार्यकर्त्यांच प्रेम मिळत. गेली १४ वर्ष निलेश राणे वाढदिनी प्रत्यक्ष शुभेच्छा देतात. हे प्रेम असच राहुदेत. आपलं प्रेम जोमानं काम करायची उर्जा देत असं मत माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त करत आभार मानले. निलेश राणेंमुळे माझ्या जीवनाला उभारी मिळाली असं प्रतिपादन करत तुमचा ऋणातच राहीन असे ऋण संजू परब यांनी व्यक्त केले. याप्रसंगी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, युवा नेते विशाल परब, भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, जिल्हा बँक संचालक महेश सारंग,रवींद्र मडगावकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी, राजू बेग, दीपक नारकर, जावेद खतीब, प्रमोद कामत, मोहिनी मडगावकर, बंटी पुरोहित, संदेश टेमकर, चंद्रकांत जाधव, पुखराज राजपुरोहित, सुनिल राऊळ, प्रितेश राऊळ, अँड. अनिल निरवडेकर, शेखर गावकर, शर्वाणी गांवकर, प्रमोद गावडे, हेमंत मराठे, दादा साईल, मकरंद तोरसकर, दिलीप भालेकर, केतन आजगावकर, विनोद सावंत, हेमंत बांदेकर, सत्या बांदेकर,अमित परब, हनुमंत पेडणेकर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आदि उपस्थित होते.