
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीच्या अध्यक्षपदी सर्वसमावेशक शिक्षक सहकार पॅनलचे पॅनल प्रमुख तथा शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांची निवड झाली आहे. त्यांनी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम यांचा अकरा विरूद्ध चार मतानी पराभव करत अध्यक्षपद पटकावले आहे.
तर उपाध्यक्षपदी सर्वसाधारण महिला प्रवर्गातून निवडून आलेल्या शिक्षक भरतीच्या सिंधुदुर्ग जिल्हा महिला प्रभागातून निवडून आलेल्या सुवेधा नाईक यांची निवड झाली आहे. विरोधात संदीप कदम यांनी अध्यक्ष पदासाठी तर मारुती पुजारे यांनी उपाध्यक्ष पदासाठी अर्ज भरला होता.सर्वसमावेशकचे संजय वेतुरेकर व सुमेधा नाईक 11 ह्यांनी अकरा मते घेतली तर विरोधकांनी प्रत्येकी चार मते मिळाली आहे.संजय वेतुरेकर आणी सुमेधा नाईक ह्या तब्बल सात मतांनी विजयी झाले आहेत.विजयी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे प्रशांत आडेलकर ,सुरेश चौकेकर,सुनील जाधव, तिवरेकर सर, सी डी चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.