संजय पिळणकरांचा सुरेश प्रभू यांच्या हस्ते सन्मान

कोविड-१९ मधील कार्याची दखल
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 11, 2022 17:19 PM
views 231  views

वेंगुर्ला : कोविड - १९ च्या संकटकाळात सातार्डा गावचे सुपुत्र व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानचे सावंतवाडी - दोडामार्ग - वेंगुर्ला तालुका विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर यांनी रक्तदान चळवळीत मोठे योगदान दिले. त्यांनी कोविड काळात सातार्डा येथे महा रक्तदान शिबीर आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच बांबोळी (गोवा) येथील बऱ्याच रुग्णांना रक्त मिळण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन वेंगुर्ला येथील 'माझा वेंगुर्ला'च्या वतीने माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

 तसेच पिळणकर यांनी कोविड काळात पुढाकार घेऊन सातार्डा, साटेली व सातोसे येथे जंतुनाशक फवारणी केली होती. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कोविड ग्रस्तांसाठी ५१ हजार रुपये दिले होते. कुडाळ येथील एका रुग्णालयाला ५ हजार रुपयांचे बीपी मशीन भेट म्हणून दिले. विविध शाळांमध्ये वृक्षारोपण कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केले. या समाजाभिमुख कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी सौ. उमा प्रभू, युवराज लखमराजे भोसले, माजी नगराध्यक्ष राजन गिरप, निलेश चेंदवणकर, सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, सचिव किशोर नाचणोलकर आदी उपस्थित होते.