
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेची महत्त्वाची सभा ०४ डिसेंबरला सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर इथं पार पडली. यावेळी जिल्हा सचिव दीपक पटेकर यांनी प्रस्तावना करून सभेच्या कामकाजाला सुरुवात केली आणि जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या आजपर्यंतच्या कामकाजाचा आढावा घेतला. ही सभा मुख्यत्वे जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट यांनी त्यांच्या व्यवसाय वृद्धीमुळे राजीनामा दिल्याने संघटनेचे नवे अध्यक्ष निवडीसाठी आयोजित करण्यात आली होती. श्रीराम शिरसाट यांनीच सुचविल्या प्रमाणे जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या प्रभारी अध्यक्षपदी सावंतवाडी तालुक्याचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या संजय लाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांनी पुष्पगुच्छ देऊन संजय लाड यांचे अभिनंदन केले. यावेळी जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब बोर्डेकर, सावंतवाडी तालुका सचिव अस्लम खतिब आदी उपस्थित होते.