संजय गांधी निराधार योजनेची नूतन कार्यकारणी जाहीर | राजन माणगावकर - माधुरी मसुरकर यांची नियुक्ती | निलेश राणे यांच्या हस्ते सत्कार

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 01, 2023 15:40 PM
views 234  views

मालवण : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी संजय गांधी निराधार योजनेची नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर केली आहे. भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांच्या शिफारशीने या समितीमध्ये वराड गावातील राजन शांताराम माणगावकर आणि सौ. माधुरी मोहन मसुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानिमित्ताने निलेश राणे यांच्या हस्ते श्री. माणगांवकर आणि सौ. मसुरकर यांचा सत्कार करण्यात आला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे निष्ठावान कार्यकर्ते असलेले राजन माणगांवकर हे गेली या अनेक वर्षे निराधार लोकांना पेन्शन योजनेचा लाभ मिळवून देत त्यांचा आधार बनले होते. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन निलेश राणे यांनी त्यांना या समितीवर प्रत्यक्ष काम करण्याची संधी दिली आहे. श्री. माणगावकर  यांनी वराड गाव व आजुबाजुच्या गावातील बऱ्याच निराधार लोकांना पेन्शन मिळवुन दिली आहे. फक्त निराधारच नाहीत तर आकस्मिक मृत्यू झालेल्या कुटुंब प्रमुखाचा सुध्दा प्रस्ताव करुन मदत मिळवून दिली आहे. प्रामाणिक पणे सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला लोकांची सेवा करण्याची संधी या निमित्ताने मिळाली आहे. तसेच वराडच्या आणखी एक महीला कार्यकर्त्या सौ. माधुरी मसुरकर यांनाही या कमिटीवर काम करण्याची संधी निलेश राणे यांनी दिली आहे. आम्ही दोघेही वराड गावचे प्रतिनिधित्व करताना वराड गावांबरोबर मालवण तालुक्यातील इतरही निराधार लोकांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहोत, अशी प्रतिक्रिया राजन माणगांवकर व सौ. माधुरी मसुरकर यांनी व्यक्त केली आहे.