देवगड येथील वृत्त निवेदक संजय धुरी यांचं निधन

Edited by:
Published on: January 01, 2024 18:13 PM
views 1409  views

देवगड : देवगड मधील सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तिमत्व असलेले संजय भालचंद्र धूरी यांचे  हृदयविकाराने निधन झाले आहे. देवगड मध्ये त्यांचा बेकरी उद्योग आहे. देवगडच्या सांस्कृतिक विश्वाला हा एक मोठा धक्का बसला आहे. मृत्युसमयी त्यांचे वय 54 वर्षे होते. देवगडमधील जल्लोष कार्यक्रमांमध्ये होणारे निवेदन ही त्यांची ओळख झाली होती. देवगड मधील अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ते निवेदन करत. देवगड लायब्ररी, देवगड रोटरी क्लब, सह अनेक संस्थांमध्ये ते काम करत होते. त्यांच्या जाण्याने सर्वच स्थरामधून हळहळ व्यक्त होत आहे.