
देवगड : देवगड उमाबाई बर्वे लायब्ररी यांच्या कडून संजय धुरी यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. उमाबाई बर्वे लायब्ररी देवगड या संस्थेचे सचिव आणि स्नेहसंवर्धक मंडळ देवगडचे अध्यक्ष संजय धुरी यांचे दुःखद निधन झाले होते . त्यांना ग्रंथालय व स्नेहसंवर्धक मंडळाच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष सागर कर्णिक यांनी 'संजय धुरी हे देवगडच्या सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील बहुआयामी व्यक्तीमत्त्व होते.तसेच ते निवेदक म्हणून ते कायम सर्वांच्या स्मरणात राहतील असे सागितले. स्नेहसंवर्धक मंडळाचे उपाध्यक्ष चारूदत्त सोमण यांनी संजय धुरी यांचे देवगडच्या कला - सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान खूप मोठे होते. त्यांच्या जाण्याने या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे ते म्हणाले.
यावेळी ग्रंथालयाच्या उपाध्यक्षा सौ. उत्तरा जोशी, संचालक सदस्य श्री एस. एस. पाटील, दत्तात्रय जोशी स्नेहसंवर्धक मंडळाचे सदस्य अॅड. अभिषेक गोगटे तसेच कवी प्रमोद जोशी, प्रसाद मोंडकर, डॉ. भाई बांदकर, लीलाधर जामदार आदी या वेळी उपस्थित होते.