
सावंतवाडी : पाडवा व भाऊबीजेच औचित्य साधून दीपकभाई केसरकर मित्रमंडळातर्फे संध्याकाळी केशवसुत कट्टा येथे''सांज पाडवा" या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले होते. मोती तलावाच्या मध्यभागी होणारा ''स्वरांजली ग्रुप जयसिंगपूर'' चा
हा कार्यक्रम सावंतवाडीकरांसाठी विशेष पर्वणी ठरला. याचा शुभारंभ माजी नगराध्यक्षा पल्लवी दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. हिंदी-मराठी गाण्यांचा सदाबहार नजराणा प्रसाद होशिष्टे, विनोद सावंत, अविनाश इनामदार, मिलिंद बनसोडे, संदीप वाडेकर, कातिका कांबळे आदी कलाकारांनी गीत गात व वाद्यांच्या माध्यमातून सादर केला. ध्वनी संयोजन अकबर इनामदार, परेश मुद्राळे यांनी तर सूत्रसंचालन कपिल कांबळी यांनी केल. यावेळी मोठ्या संख्येने सावंतवाडीकर केशवसुत कट्टयासह तलाव काठी उपस्थित होते. सदाबहार गीतांच्या सादरीकरणानं तलाव काठ चैतन्यांन फुलला होता. यावेळी दीपकभाई केसरकर मित्रमंडळाचे बाबू कुडतरकर, राजन पोकळे, आबा केसरकर, सुजित कोरगावकर, अनारोजिन लोबो, शुभांगी सुकी, भारती मोरे, निता कविटकर, दिपाली सावंत, सुरेंद्र बांदेकर, प्रदीप ढोरे, मुकुंद वझे, दत्तप्रसाद गोठस्कर आदी शेकडो संगीत प्रेमी उपस्थित होते.