'सांज पाडव्या'मुळे सावंतवाडीकर झाले मंत्रमुग्ध !

Edited by: विनायक गावस
Published on: November 15, 2023 16:04 PM
views 167  views

सावंतवाडी : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मित्रमंडळाच्या माध्यमातून दीपावली पाडवा निमित्त सायंकाळी सांज पाडवा कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले होते. मोती तलाव काठावर रंगलेल्या या सुरांच्या मैफिलीत सावंतवाडीकर मंत्रमुग्ध झाले.

 जगन्नाथराव भोसले उद्यानासमोर सांज पाडवा स्वर निनाद प्रस्तुत सत्यम शिवम सुंदरम हा हिंदी व मराठी गीताचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याचा शुभारंभ माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. हिंदी, मराठी गीतांच्या मैफीलीत पाडव्याची संध्याकाळ सावंतवाडीकरांच्या स्मरणात राहणारी ठरली. याप्रसंगी माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर, अनारोजीन लोबो, भारती मोरे, शर्वरी धारगळकर, शुभांगी सुकी, दिपाली सावंत, किरण नाटेकर, निलिमा चलवाडी आदी उपस्थित होते.