महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक - वादक कलाकारांचा संगीत महासंग्राम

अमरसेन सावंत मित्र मंडळ आयोजित
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 26, 2023 19:14 PM
views 220  views

कुडाळ : कै. शंकर उर्फ बाळू गावडे( माजी सरपंच) आणि कै. माजी आमदार पुष्पसेन (नाना )  सावंत यांच्या स्मरणार्थ अमरसेन सावंत मित्र मंडळआयोजित शनिवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ठीक. 7. वाजता श्री गणेश मंदिर समोर पणदूरतिठा येथे संगीत महासंग्राम पकवाज - तबला जुगलबंदी आयोजित करण्यात आली आहे.

यामध्ये महाराष्ट्र रायगड भूषण जगविख्यात पकवाज वादक तालमणी पंडित  प्रतापराजजी पाटील (खारघर मुंबई) व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध   गायक   इंडियन आयडॉल मराठी विजेते पंडित शंकररावजी वैरागकर यांचे पट्ठ शिष्य जगदीश चव्हाण (नाशिक) विरुद्ध  महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक भजन सम्राट आदिनाथ सटले गुरुजी (  आळंदी देवाची ) व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तबलावादक पंडित रामदासजी भोयर यांचे पट्ट शिष्य पांडुरंग पवार (पुणे) यांच्यात ही संगीत महासंग्राम पखवाज तबला जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भजन रसिक मंडळींनी या संगीत महासंग्राम पकवाज तबला जुगलबंदी याचा लाभ घ्यावा असे आवाहन अमरसेन  सावंत मित्र मंडळ यांनी केले आहे.