कोकीसरेत संदेश पारकरांचा घरोघरी प्रचार

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: November 16, 2024 18:09 PM
views 221  views

वैभववाडी : महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांचा कोकीसरे जिल्हा परिषद विभागात  प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे. प्रसाद नारकर यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

   कणकवली विधानसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीत लढत होत आहे. या मतदारसंघातील वैभववाडी तालुक्यातील कोकीसरे विभागात महाविकास आघाडीकडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे. या भागातील कोकीसरे, नाधवडे, नापणे या गावात श्री पारकर यांना मतदान करण्याच आवाहन करण्यात येत आहे. यावेळी नंदू शिंदे, संदीप सरवणकर, राजेश तावडे, रोहित पावसकर, यशवंत गवाणकर, विठोजी पाटील यासह ठाकरे सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.