
कणकवली : कणकवली विधानसभा मतदार संघाचे उबाठाचे उमेदवार संदेश पारकर यांचा शनिवारी खारेपाटण बाजार व परिसरात झंजावती प्रचार दौरा झाला. यावेळी खारेपाटण बंदरवाडी येथील नागरिकांनी संदेश पारकर यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात केला प्रवेश केला.
गेल्या दहा वर्षात येथे स्थानिक आमदाराने आमच्या बंदर वाडीचा कोणत्याही प्रकारचा विकास केला नाही फक्त इलेक्शन पुरत्या भूलथापा मारल्या. खारेपाटण गावाचा झाला नाही. त्यामुळे स्थानिक आमदाराला कोणत्याही प्रकारची मदत करायची नाही. असा संकल्प करून इथल्या लोकांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात केला प्रवेश. तर सर्वसामान्य जनतेच्या हाकेला धावून येणारा संदेश पारकर या उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान करण्याचा निर्णय यावेळी येथील ग्रामस्थांनी घेतला असल्याचे सांगितलं.
प्रवेश करणाऱ्यांमध्ये असरफ मुकादम, तेजस मुकादम, तेसिम मुकादम, यास्मिन मुकादम, फर्जना मुकादम, अब्दुल्ला मुकादम, अंजू ठाकूर, इरफान ठाकूर अनेक नागरिकांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात केला प्रवेश. यानंतर पंचक्रोशीत संदेश पारकर व पदाधिकारी यांनी प्रचार दौरा राबविला.