
देवगड : महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या देवगड जामसंडे शहराच्या प्रचाराची सुरुवात जामसंडे गावचे ग्रामदैवत श्री दिर्बादेवी रामेश्वर मंदिर येथे दर्शन घेऊन करण्यात आली. यावेळी सुशांत नाईक म्हणाले दहा वर्ष आ.नीतेश राणे यांच्या हातात सत्ता असून सुद्धा देवगडच्या पाणी प्रश्नासाठी आजही झुंजावे लागत याच्यासारखं दुर्दैव आहे. आम्ही विकास केला अशा वल्गना करतानाआपण देवगड वासीयांसाठी काहीही करू शकलो नाही याचाही विसर राणे यांना पडलेला दिसतो. देवगडचा पाणीप्रश्न महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे सोडू असं आश्वासन नाईक यांनी यावेळी बोलताना देवगड वासियांना दिले.
निवडणुकीला सामोरे जाताना लोकांचा उत्तम प्रतिसाद हेच आमचं भाग्य आहे.आमदारांचे निष्क्रिय राजकारण हे आमच्या पथ्यावर पडतंय लोक आम्हाला भरभरून मतदान करतील असा विश्वास त्यांनी यावेळी त्यांनी बोलताना व्यक्त केला.यावेळी कणकवलीचे युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक, तालुका अध्यक्ष मिलिंद साटम, युवानेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उमेश कुळकर्णी , माजी नगरसेविका हर्षा ठाकूर, काका जेठे, विशाल मांजरेकर ,निनाद देशपांडे,तुषार भाबल, विकास कोयंडे आदी उबाठा पदाधिकारी उपस्थिती होते.