संदेश पारकर यांच्या प्रचाराचा कणकवलीत शुभारंभ

समृद्धी पारकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रारंभ
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: November 07, 2024 20:15 PM
views 367  views

कणकवली : कणकवली शहरात महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचाराचा सौ. समृद्धी संदेश पारकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवूनआज (ता.७ )शुभारंभ झाला. येथील  श्री स्वयंभू मंदिर व परमहंस भालचंद्र महाराज यांचे आशीर्वाद घेऊन प्रचाराचा प्रारंभ केला.  

  विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा रणसंग्राम तापू लागला आहे. कणकवली शहरात महाविकास आघाडीकडून आज प्रचाराला प्रारंभ करण्यात आला. ठाकरे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे पदाधिकारी व  कार्यकर्ते मतदारांच्या गाठीभेटी घेत होते. शहरातील प्रत्येक घरातून मतदारांना माहीती पत्रक देऊन संदेश पारकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करीत आहेत. 

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, सौ. समृद्धी पारकर, रुपेश नार्वेकर, प्रदीप मांजरेकर, सौरभ पारकर,उत्तम लोके, दिवाकर मुरकर, सुजित जाधव, तेजस राणे, आदित्य सापळे,संतोष पुजारे, सोहम वाळके, साई कोदे, प्रद्दूम मुंज, योगेश मुंज, जय शेट्ये, समीर पारकर, प्रसाद अंधारी, कौशिक पारकर, अजित काणेकर, नीलम पालव, दिव्या साळगांवकर, सेजल पारकर, शीतल सावंत, रोहीनी पिळनकर, शीतल पारकर, नेहा पारकर, साधना माने, पूनम म्हापसेकर व आदी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.