पोयरे गावची संदेश पारकरांना साथ

Edited by:
Published on: November 07, 2024 13:48 PM
views 119  views

सिंधुदुर्ग : पोयरे गावात संदेश पारकर यांचे प्रचारार्थ बैठक पार पडली.  गेल्या दहा वर्षात येथे स्थानिक आमदारांनी कोणत्याही प्रकारचा विकास पोयरे गावाचा केला नाही. तसेच येथील मच्छीमारांचे प्रश्न सुद्धा सोडवू शकले नाहीत, असा आरोप करण्यात आला.  त्यामुळे इलेक्शन पुरत्या भुलथापा मारणाऱ्या आमदारांना घरी बसवल्याशिवाय पोयरे गावातील ग्रामस्थ गप्प बसणार नाहीत असा निश्चय या बैठकीत करण्यात आला.

 जनतेच्या एका केला धावून येणारा संदेश पारकर सारखा आमदार येणाऱ्या विधानसभेला पाठवला तर आमच्या गावचा विकास होईल अशा भावना येथील ग्रामस्थांनी येथे झालेल्या बैठकीत काढल्या.. त्यामुळे पोयरे गाव शंभर टक्के संदेश भाई पारकर यांनाच मतदान करणार असा संकल्प करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत गणेश गावकर, रवींद्र कासले, भिकाजी परब आणि पोयरे गावातील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.