
दोडामार्ग : उबाठा कणकवली विधानसभा जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी दोडामार्ग तालुक्यातील येथील पदाधिकारी यांनी नियोजन केलेल्या दोडामार्ग तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते,, व्यावसायिक तसेच पत्रकार यांच्या घरी जाऊन गणेश दर्शन घेतले.
यावेळी साटेली भेडशी येथील सार्वजनिक गणपतीचे ही दर्शन घेतले व सत्यनारायण महापूजा चा प्रसाद विविध ठिकाणी घेतले. साटेली भेडशी, कोनाळ कट्टा हेवाळे , मोर्ले, झरे पुनर्वसन, तळकट आदी गावात भेटी दिल्या. यावेळी त्यांचसमवेत जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, सावंतवाडी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, तालुकाप्रमुख संजय गवस, सह संपर्क प्रमुख संदिप धर्णे, विभाग प्रमुख संतोष मोर्ये , दशरथ मोरजकर तालुका संघटक लक्षमण आयनोडकर, उप तालुका संघटक संदेश वरक, सोशल मीडिया ता. प्रमुख संदेश राणे, युवा सेना उप तालुका प्रमुख संदेश गवस, विउपविभाग प्रमुख गणपत डींगणेकर, आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.