संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रम..!

Edited by:
Published on: March 31, 2024 14:35 PM
views 273  views

कणकवली : युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांच्या ५० व्या  सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवार २ एप्रिल २०२४  सकाळी ९ वा .रक्तदान शिबिर स्थळ- कनेडी बाजारपेठ, सांगवे रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू,रात्री ९ वा.दशावतारी नाटक -वेतोबा (चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ, चेंदवण  ,मालक- देवेंद्र नाईक) स्थळ- कनेडी बाजारपेठ, सांगवे,येथे आयोजित करण्यात आला आहे.

बुधवार ३ एप्रिल सकाळी १०

वाढदिवस शुभेच्छा कार्यक्रम स्थळःकनेडी बाजारपेठ, सांगवे ,सकाळी ११ वाजता कै. सुधीर सावंत यांच्या स्मरणार्थ,स्वर्गरथ (शव वाहिनी) लोकार्पण सोहळा तसेच संध्याकाळी ७ वा.वाढदिवस शुभेच्छा कार्यक्रम भगवती मंगल कार्यालय, कणकवली, त्यानंतर संध्याकाळी- ७.३० संगीत रजनी, रात्रौ ८ वा.पासून स्नेहभोजन स्थळ - भगवती मंगल कार्यालय, कणकवली येथे  संदेश सावंत व  समीर नलावडे मित्र मंडळ कणकवली आयोजित करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणूक आचारसंहिते नंतर- मोफत देव दर्शन,५० गरीब वृद्धांना विमानाने तिरुपतिदर्शन, १५० गरीब वृद्धांना सालाबाद प्रमाणे पंढरपूर वारी काढण्यात येईल.

शनिवार ११ मे २०२४ रोजी महिलांसाठी पाककला स्पर्धा व

होम मिनिस्टर स्पर्धा होणार आहे.विजेत्यांना फ्रीज, वॉशिंग मशीन, ओव्हन,कुलर मिक्सर, कुकर आदि बक्षिस ठेवण्यात आली आहेत.रविवार १२ मे २०२४ - एक दिवस छोट्या दोस्तांचा आनंद जत्रा,फुड फेस्टिवल,जादुचे प्रयोग, मनोरंजक खेळ आणि बक्षिसांची लयलूट असेल.रविवार २ जून २०२४  -आंबे खाण्याची स्पर्धा तरी सर्वानी सहभागी होण्याचे आवाहन युवा संदेश प्रतिष्ठान अध्यक्षा संजना संदेश सावंत यांनी केले आहे.