ED चा 'प्रताप' आणतोय 'नायक'ला हुडी हुडी ताप

संदिप सरवणकरांची शिंदे गटावर मिश्कील टीका
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 02, 2022 12:45 PM
views 433  views
हायलाइट
प्रताप सरनाईक आणि मुख्यमंत्र्यांमध्ये वाद असल्याच्या चर्चा

वैभववाडी : शिवसेना व शिंदे गटात सध्या शाब्दिक शीतयुद्ध जोरदार सुरू आहे. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आ.प्रताप सरनाईक यांच्या कथित वादावरून शिवसेनेकडून जोरदार टीका होत आहे. या वादावर शिवसेना जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप सरवणकर यांनी मिश्कील शब्दांत टीका केली आहे.

सरवणकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की,"नायक" सिनेमात आनिल कपुरने एक दिवसाचा मुख्यमंत्री बनुन स्टाईलबाज कामाचा दणका दाखवला होता. तसा  प्रयत्न करुन राज्याचे मुख्यमंत्री आपण ६ वाजे पर्यंत जनतेसाठी जागतो असे नेहमी दाखवण्याचा  प्रयत्न करत आहेत .परंतु आता त्यांची झोपच उडणार की काय? असे वाटत आहे. कारण त्यांचे जवळचे सहयोगी, जे ईडीतुन क्लिनचीट मिळवुन झाल्यावर कँबिनेट मंत्रीपदासाठी गुडघ्याला बांशीग बांधुन  तयार होते. त्यांनी आता  आपले  आोवळा - माजीवडा मतदारसंघ भाजपाला देवुन मुख्यमंत्री आपल्यालाच गुडघ्यावर  बसवतात कि काय?  याचे भय वाटु लागल्यांने,  मुख्यमंत्र्यांविरोधात  दंड थोपटले आहे.

 मंत्रीपदाला आपली वर्णी लागते का नाही ?  असे स्वप्न बघता बघता आपली आमदारकीचा मतदारसंघ भाजपाला जातेा का ? याची शंका त्याना आली  व त्यातुन आधी असंतुष्ट त्य‍ात वितुष्ट दिसणे सहाजिकच होते.

कोकणात सुध्दा मंत्रीपदासाठी गुडघ्याला बांशीग बांधुन एक आमदार भाऊ तयार होते. परंतु बंडखोराचे भाऊगर्दित त्यांची ही डाऴ शिजली नाही.  तळकोकणात  आपल्याच  जातबंधुशी लढण्यासाठी तळ टाकुन सज्ज बसलेल्यांना जिल्हा अध्यक्षांना  पक्षश्रेष्ठींकडुन सज्जड दम बसल्याचे समजत आहे. त्यांचे ध्यानी मनी नसताना , प्रतिस्पर्ध्याचेच प्रवक्ते बनण्याची वेळ आली. हा काही कपिलासष्टी योग असावा असे नक्कीच नाही.

यातुन , मात्र सरकारचे वरवर ठिक वाटणारे  भवितव्य हे एकंदरीत अंतर्गत अंधातरीच  दिसते. संत शिरोमणी एकनाथानी पंढपुरच्या  वाळवंटात, कावडीतील  चंद्रगंगेचे पाणी, उन्ह‍ात तडपडण‍ार्‍य‍ा गाढवाला पाजुन जिवनदान दिले होते. अशी कथा आपण ऐकुन होतो.परंतु ईडीतुन जीवनदान मिळाल्यावर, मात्र  उलट्या लाथा झाडणारी गाढवे, एकनाथालाच पाणी पाजणार तर नाहीना .हा येणारा काळच सांगेल असे मिश्कीलपणे सरवणकर यांनी टीका शिंदे फडणवीस सरकारवर केली आहे.


प्रताप सरनाईक आणि मुख्यमंत्र्यांमध्ये वाद असल्याच्या चर्चा 

गेल्या काही दिवसांपासून आमदार प्रताप सरनाईक आणि मुख्यमंत्री यांच्यात खडाजंगी झाल्याच्या चर्चा होत्या. सरनाईकांचा मतदारसंघ भाजपला देण्यावरून हा वाद झाल्याची माहिती आहे.