
वैभववाडी : तालुका खरेदी विक्री संघांच्या संचालकपदी निवड झालेल्या पांडुरंग पाटील यांचा नापणे ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. शिवसेना जिल्हा कार्यकारणी सदस्य संदिप सरवणकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये नापणे गावचे पांडुरंग पाटील यांची निवड झाली. याबाबत त्यांचा गावच्यावतीने सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला श्री सरवणकर यांनी उपस्थित राहत अभिनंदन केले. यावेळी सदानंद पाटील,संतोष पाटील,शंकर कोकरे,रमेश साळुंखे,मनोहर पाटील,बापुराम गुरव,विश्वनाथ पाटील,प्रेमदत्त माने,समाधान काडघे,ज्ञानेश्वर सावंत,रमेश पाटील,विजय गुरव,किशोर कोकरे,चंद्रकांत पाटील,प्रतिक पाटील,अनिरुद्ध सोनार,सुदर्शन पाटील,बाऴा सरवणकर आदी उपस्थित होते.याप्रसंगी बाोलताना सरवणकर यांनी गौरव उद्दगार काढले ,पांडुरंग पाटील यांची निवड ही नापणे गावचा सांघीक सत्कार आहे.शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सदैव काम करत राहावे अशा शुभेच्छा दिल्या.