
सावंतवाडी : भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. शालेय विद्यार्थांना शालोपयोगी वस्तू, रूग्णांसाठी साहित्य, फळ वाटप व महावितरणच्या वीज मित्रांना रेनकोट वाटप आदि उपक्रम राबविण्यात आले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
माजी पंचायत समिती सदस्य संदिप गावडे यांचा वाढदिवस त्यांच्या मित्रमंडळींकडून सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. सावंतवाडी,माजगाव, वेत्ये, सोनुर्ली येथील जिल्हा परिषद शाळांत वह्या वाटप, उपजिल्हा रुग्णालयाला ब्लॅकेंट वाटप व रूग्णांना फळ वाटप करण्यात आले.महावितरणच्या वीज मित्रांना रेनकोट वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. तसेच माजगाव चिपटेवाडीत दप्तर, वह्या वाटप करण्यात आले. दरवर्षी आपण वह्या वाटप उपक्रम करतो. होतकरू विद्यार्थ्यांना मदत म्हणून एक सामान्य कार्यकर्ता म्हणून हा उपक्रम गेली अनेक वर्षे राबवितो. ही मुलं देशाच भविष्य आहे. त्यामुळे हे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी आमचा नेहमी प्रयत्न असतो. आमचे नेते मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनाखाली आम्ही कार्यरत आहोत अशा भावना संदिप गावडे यांनी यावेळी व्यक्त केल्या.
दरम्यान, वीजेची समस्या लक्षात घेऊन सावंतवाडीतील जि.प.च्या अकरा शाळांत 'ऑफ ग्रीड रूफ्ट ऑफ सोलर' ही योजना राबवीली जाणार आहे. वाढदिवसाच्या निमीत्ताने या संकल्पनेचा शुभारंभ करण्यात आला. तालुक्यातील अकरा जिल्हा परिषद शाळांत प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने राज्याचे कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच सावंतवाडीतील पत्रकार मित्रांच्या उपस्थित केक कापून श्री.गावडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य पंकज पेडणेकर, अजय सावंत, गेळे सरपंच सागर ढोकरे आदी उपस्थित होते.