सनातनचे साधक डॉ. रमेश पेंढारकर यांचं निधन

Edited by: विनायक गावस
Published on: June 26, 2023 20:23 PM
views 124  views

सावंतवाडी : येथील सनातनचे साधक डॉ. रमेश दत्ताराम पेंढारकर (वय ७८ वर्षे) यांचे २५ जून या दिवशी अल्पशा आजाराने ठाणे (मुंबई) येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, २ भाऊ, १ भावजय, २ विवाहित बहिणी आणि नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार पेंढारकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.


सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी गोवा राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्हा येथे जिज्ञासूंसाठी वर्ष १९९२ मध्ये साधनेविषयी मार्गदर्शन वर्ग घेण्यास प्रारंभ केला. सावंतवाडी येथे झालेल्या पहिल्या वर्गाच्या वेळी डॉ. पेंढारकर यांची आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची पहिली भेट झाली. त्यानंतर सावंतवाडी येथे झालेले सर्व वर्ग आणि वर्ग चालू होण्यापूर्वीची सिद्धता या सेवांमध्ये सहभागी झाले होते. तसेच सिंधुदुर्गात प्रसारकार्याला प्रारंभ झाल्यानंतर डॉ. पेंढारकर यांच्या निवासस्थानी सत्संग होत असत. डॉ.पेंढारकर यांनी तेव्हापासून आतापर्यंत विविध सेवा केल्या आहेत. १९७१ते१९७३ या कालावधीत त्यांनी जिल्हा परिषद दवाखाना, अंब्राड, ओसरगाव येथे तीन वर्षे मेडिक ऑफिसर म्हणून सेवा केली. १९७४ ते १९८९ पर्यंत शिरोडा व आरोंदा येथे दवाखाना उघडून रुग्ण सेवा केली आहे. १९८९ते१९९५ पर्यंत सावंतवाडी येथे राहत्या घरी रुग्ण सेवा केली. रात्री अपरात्री रुग्ण तपासणीत त्यांनी कधीही दिरंगाई केली नाही. त्यामुळे ते जनमानसात लोकप्रिय होते.


पेंढारकर कुटुंबीय सावंतवाडील श्री देव आत्मेश्वर मंदिराशी स्थापना कालापासून संबंधित आहेत. आताच्या पिढीतील ते स्वतः त्याचीही पूजा अर्चादी सेवा मनोभावे करत असत. एक सालस व सनातनचे साधक म्हणून ते जनमानसात परिचित होते.