
सावंतवाडी : आत्ताच झालेल्या गांधी विचारधारा व दर्शन या पदविका परीक्षेत समीर वंजारी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 73% घेऊन घवघवीत दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यापूर्वी ते पत्रकारिता तसेच ह्यूमन राइट्स या घवघवीत यश संपादन केलं होत. त्यांना या परीक्षेमध्ये बुवा सर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले होते. सामाजिक व राजकीय काम करत असताना गांधी विचारधारेसारखे अभ्यासक्रम महत्त्वाचे आहेत असही त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले.