
कणकवली : वसई-नालासोपारा- विरार (शहर) कुंभार समाज मंडळाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा कुंभार समाज माजी अध्यक्ष आणि कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस विलास गुडेकर यांना कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सतीशदादा दरेकर यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी आयुक्त तथा मुंबई महानगरपालिका अजित बाळामो कुंभार उपस्थित होते. हा पुरस्कार रविवार ४ डिसेंबर रोजी एका कार्यक्रमामध्ये नालासोपारा येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
विलास गुडेकर हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.
कुंभार समाज उन्नतीसाठी आणि विविध उपक्रम राबविण्यात ते अग्रेसर असतात. त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना वसई-नालासोपारा-विरार कुंभार समाज मंडळामार्फत समाजभुषण पुरस्कार देण्यात आला आहे. याबद्दल विलास गुडेकर यांचे अभिनंदन होत आहे.