
सावंतवाडी : तालुका नाभिक संघटनेची बैठक संपन्न झाली. यामध्ये वाढत्या महागाईच्या दृष्टिकोनातून सावंतवाडी तालुका नाभिक संघटनेच्यावतीने ठरविण्यात आले की येत्या 1 जानेवारी 2025 पासून सलून दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये सावंतवाडी तालुक्यातील सर्व नाभिक सलून दुकान, मालक बांधव उपस्थित होते. सर्वांच्या अनुमते एका मताने निर्णय घेण्यात आला.
यावेळी उपस्थित पदाधिकारी महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ चे सरचिटणीस राजन पवार, सावंतवाडी तालुकाध्यक्ष सदानंद पवार, उपाध्यक्ष सदानंद होडावडेकर, दाजी पवार, जिल्हा उपाध्यक्ष सुनील न्हावेलकर, ज्येष्ठ सल्लागार शांताराम वेतुरेकर, सावंतवाडी युवा शहर अध्यक्ष अक्षय चव्हाण, तुषार पवार, दयानंद वेंगुर्लेकर तसेच सावंतवाडी सर्व कार्यकारणी पदाधिकारी विभागीय अध्यक्ष व कार्यकारणी या मीटिंगमध्ये उपस्थित होते.