साक्षी रामदुरकर, विभव राऊळ, गार्गी सावंत, यश सावंत, सोहम देशमुख बुदधिबळ स्पर्धेचे विजेते !

Edited by: विनायक गांवस
Published on: September 04, 2024 10:35 AM
views 150  views

सावंतवाडी : मुक्ताई ॲकेडमीतर्फे विदयार्थ्यांसाठी सावंतवाडी तालुकास्तरीय बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन राणी पार्वती देवी शाळेच्या सभागृहात करण्यात आले.स्पर्धेत पहीली ते महाविदयालयीन विदयार्थी, विदयार्थिनींच्या पाच गटात 72 मुलांनी सहभाग घेतला.प्रत्येक गटातील पाच विजेत्यांना अशी एकूण पंचवीस रोख बक्षिसे, ट्राॅफी, मेडल आणि प्रशस्तीपत्रं देण्यात आली.विशेष म्हणजे जिल्ह्यात पहिल्यांदाच शाळांसाठी "बेस्ट स्कुल" ट्राॅफी हा पुरस्कार देण्यात आला.

सावंतवाडीतील प्रसिदध न्युरो सर्जन डाॅ.अंबापूरकर यांनी बुदधिबळ खेळल्याने विदयार्थ्यांना होणारे फायदे सांगितले.मुक्ताई ॲकेडमी कोकणातील मुलांसाठी व्यासपीठ मिळवून देते हे कौतुकास्पद आहे, हे सांगताना अशा ॲकेडमीतुन मिळणारे प्रशिक्षण मुलांनी घ्यावे, असे डाॅ.अंबापूरकर म्हणाले.सुभेदार सावंत यांनी ॲकेडमीच्या उपक्रमाला शुभेच्छा देताना विदयार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.डाॅ.अंबापूरकर, सुभेदार सावंत, ज.ल.शिर्सेकर शिक्षण संस्थेच्या श्रीमती अनुपमा शेटगे, किरण सावंत, प्रवीण सावंत,कौस्तुभ पेडणेकर इत्यादी मान्यवरांच्या हस्ते विदयार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. पहीली ते चौथी मुलगे - प्रथम यश सावंत, द्वितीय दक्ष वालावलकर, तृतीय अद्विक पाटील, चौथा स्मित सावंत, पाचवा विघ्नेश अंबापूरकर, पहीली ते सहावी मुली - प्रथम गार्गी सावंत, द्वितीय आस्था लिंगवत, तृतीय मायरा काजरेकर, चौथी पलक पाटणकर, पाचवी श्रेया सावंत, पाचवी ते सातवी मुलगे - प्रथम सोहम देशमुख, द्वितीय बृंधव कोटला, तृतीय चिन्मय चव्हाण, चौथा हर्ष राऊळ, पाचवा प्रज्योत पुराणिक, सातवी ते महाविदयालयीन मुली - प्रथम साक्षी रामदुरकर, द्वितीय किमया केसरकर, तृतीय आरना राणे, चौथी समृदधी दळवी, पाचवी शाल्मली पाटील, आठवी ते महाविदयालयीन मुलगे - प्रथम विभव राऊळ, द्वितीय यथार्थ डांगी, तृतीय वेदांत देसाई, चौथा सोहम कोरगावकर, पाचवा कुणाल हरमलकर "Best School" ट्राॅफी हा पुरस्कार "शांतीनिकेतन इंग्लिश मीडिअम स्कूल" या शाळेला देण्यात आला.उपाध्यक्षा सौ.स्नेहा पेडणेकर यांनी आभार मानले.