सावंतवाडी : भिल्लवाडी गृप मळगाव आयोजित सिंधुदुर्गातील प्रसिद्ध दशावतार कलाकार नितिन आसयेकर प्रस्तुत श्री देवी भुमिका दशावतार लोककला नाट्य मंडळ यांचा भव्य-दिव्य असा राम भक्तीवर आधारित दर्जेदार पौराणिक अध्यात्मिक ट्रिक्सीन युक्त नाट्यप्रयोग भक्त शिरोमणी संत कबीर चे आयोजन १ जानेवारी २०२५ रोजी राञौ ठिक ९ वाजता मळगाव येथील छञपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आले आहे.
या नाट्यप्रयोगात श्री.नितिन आसयेकर सोबत दीप निर्गुण, देवेश कुडव, बंड्या परब, किरण नाईक, रमेश खोत, रावजी तारी, गुरु वराडकर, रुपेश माने हे कलाकार आपली कला सादर करणार, तसेच त्यांना हार्मोनियम सिद्धेश राऊळ, पखवाजवादक प्रकाश मेस्त्री, झांजवादक कुणाल परब हे साथ देणार आहेत.
सिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध दशावतारी कलावंत अभिनय कुमार नितीन आसयेकर लिखित बाळूमामा या यशस्वी नाट्यप्रयोगानंतर नितीन आसयेकर या वर्षीसाठी घेउन येत आहेत रामभक्तीवर आधारित भव्य ट्रिक सीन नी सजलेला असा जबरदस्त नाट्य प्रयोग *भक्त शिरोमणी संत कबीर* रसिकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. या सुंदर नाट्यप्रयोगाचा सर्व रसिकांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन भिल्लवाडी गृप, मळगाव चे अध्यक्ष श्री.पांडुरंग राऊळ यांनी केले आहे.